#

Advertisement

Friday, March 1, 2024, March 01, 2024 WIB
Last Updated 2024-03-01T12:07:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात जल आणि वनदिंडी

Advertisement

सावली फाउंडेशन व ड्रीम फाउंडेशनचा उपक्रम

सोलापूर: जागतिक जल, वन व हवामान दिनाच्या औचित्याने सावली फाउंडेशन व ड्रीम फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. पाण्याविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी शनिवारी (ता. २) सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजी महाराज तलाव येथून जल व वनदिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी दिली. यंदा ११वे राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलन होणार आहे. या अंतर्गत घोष वाक्य स्पर्धा व जलजागृती पोस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे. जल दिंडीचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे. यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे आदींची उपस्थिती आहे.
दिंडीचा वसुंधरा महाविद्यालय येथे समारोप होणार आहे. समारोपप्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. यावेळी अभय दिवाण, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रा. तानाजी देशमुख, अंबादास पांढरे, प्रा. समिना नदाफ मार्गदर्शन करणार आहेत.