#

Advertisement

Monday, March 11, 2024, March 11, 2024 WIB
Last Updated 2024-03-11T11:59:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभा लढवणार का?

Advertisement

निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले. यातच त्यांनी खासदरा अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या. यावर निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे.
लोकसभा मतदार संघामध्ये मी संपर्क वाढलाय. माझ्या सहकारींची तशी इच्छा आहे. पण, मी अद्याप निर्णय घेतला नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. लोकसंपर्क वाढवण्याचा, मित्रपरिवार जपण्याचा मला छंद आहे. याचा अर्थ मला निवडणुका लढवायच्या आहेत, असा अर्थ नाही. पण, राजकारणात काही सांगता येत नाही.  वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता, यावरही त्यांनी भाष्य केले. कार्यकर्ते प्रेमाने बॅनर लावतात. त्यांना प्रोटोकॉल नसतो. मला प्रोटोकॉल आहे. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन असे काही होणार नाही. इतर पक्षात कोण काय करतं? कोणाचं काय काम आहे? हे बघण्यापेक्षा आपल्या कामाची रेष वाढवावी, असे मानणारा मी कार्यकर्ता असल्याचे लंके म्हणाले.