Advertisement
अमित शहा यांनी शिंदे, पवार याना सुनावले
दिल्ली : भाजपा सध्या महाराष्ट्रावर फार जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने केंद्रातूनही जागावाटपामध्ये जास्त तडजोड करण्याची तयारी नसल्याचं चित्र आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्या जागांचीच मागणी करा असा थेट संदेशच अमित शाहा यांनी शिंदे, पवारांना शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत चालेल्या बैठकीमध्ये दिला असल्याचं समजते.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिला असून केवळ भाजपाचे लक्ष्य 370 जागांचे आहे. त्यामुळेच पहिल्या यादी जाहीर करताना प्रत्येक जागेवर उमेदवार निवडताना जिंकेल त्याला उमेदवारी, या सूत्रानुसार भाजपाने उमेदवारांची घोषणा केली.
महाराष्ट्र संभाव्य उमेदवारी नावे आज अंतिम ...
आज सायंकाळी नवी दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रामधून यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील रवाना झाले आहेत. या बैठकीमध्ये दुसऱ्या यादीवर चर्चा होणार असून त्यात महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमधील आघाडीचं सरकार असलेल्या राज्यांमधील उमेदवारांची नावं निश्चित होतील आणि रात्री उशीरा भाजपाची दुसरी यादी जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
