#

Advertisement

Wednesday, March 6, 2024, March 06, 2024 WIB
Last Updated 2024-03-06T11:30:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पाकिस्तानमधून खासदार नवनीत राणा यांना धमकी

Advertisement

अमरावती : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आली आहे. त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या धमकी प्रकरणास वेगळे वळण मिळाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी ‘एमआयएम’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअ‍ॅपवर क्लिप पाठवून धमकी आली आहे. या मेसेजमध्ये भाजपच्या मोठया मोठया नेत्यांची नावे घेतली आहे. देशाला उडवून देण्याची धमकी त्यात दिली. या प्रकरणी नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्याक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन मेसेज पाठवणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (२),67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.