#

Advertisement

Monday, March 4, 2024, March 04, 2024 WIB
Last Updated 2024-03-04T12:10:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवाजी आढळराव पाटील यांचा एकोपा

Advertisement

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खूपच चुरशीची होणार आहे. कारण यावेळेस शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गट एकमेकांविरोधात लढणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवताना त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंचर येथे उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केला. हा प्रवास आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.
मंचर येथे शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेद्वारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार? याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे.