#

Advertisement

Monday, March 4, 2024, March 04, 2024 WIB
Last Updated 2024-03-04T11:54:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हर्षवर्धन पाटलांना खुलेआम धमकी

Advertisement

मित्रपक्षाचे पदाधिकारी म्हणतात तालुक्यात फिरू देणार नाही
मुंबई :  भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल आहे. इंदापूर तालुक्यात फिरु न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी केला आहे. इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं असून  ही बाब गंभीर असून यात तत्काळ लक्ष द्यावे, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांकडे केली आहे.
आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की, तुम्हाला आम्ही तालुक्यात फिरु देणार नाही. माझ्या सारख्या माणसाला धमक्या येतात. भविष्यात फिरु देणार नाही, असं जाहीर वक्तव्य केलं जातं. याच्या क्लिपिंग आहेत. अशा धमक्या आल्या तर काम कसं करायच? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही तालुक्यात फिरु देणार नाही. माझ्या सारख्या माणसाला धमक्या येतात. भविष्यात फिरु देणार नाही, असं जाहीर वक्तव्य केलं जातं. याच्या क्लिपिंग आहेत. अशा धमक्या आल्या तर काम कसं करायच? असा प्रश्न हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. जेथे मी आमदार राहिलो. तेथे मित्रपक्षाचे पदाधिकारी भाषणातून खुलेआम धमकी देतात. ही बाब गंभीर आहे. हे एवढ्यावरच थांबेल, असे मला वाटत नाही. भविष्यात काही विपरित घडू नये. यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.