Advertisement
मुंबई : इंदापुरात फिरु न देण्याची धमकी आल्याची तक्रार हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे. वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी दिला आहे. प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावं, असं आवाहन अंकीता पाटील यांनी केलं आहे. माझ्या वडिलांबाबत असं एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुकाध्य आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवावं, , असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत.
हनुमंत कोकाटे यांनी पाटील यांच्यावर टीका करताना वापरली शिवराळ भाषा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली. “तुझ्याजवळ काय होतं? महाले साहेब म्हणून एक होता, खरेदी-विक्री संघात अधिकारी होता. इथं 2 हजारासाठी 2 तास त्याच्या दाराबाहेर बसावं लागत होतं. या हर्षवर्धव पाटलाला. अकलूजला मोटारसायकलवर जाण्यासाठी सावंतांकडे 3 तास दुकानात थांबायचा. आन हे काय सांगतो? मामानं असं केलं अन् तसं केलं? आरे मामा गाडीत आणि माडीतच जनमलेला आबे. तुझ्याजवळ काय होतं तेव्हा, 1970 मध्ये मामाकडे गाडी आणि बंगला होता. तुझ्यासारखा असा भिXXXX नव्हता”, अशा शब्दांत हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली.
