#

Advertisement

Thursday, March 14, 2024, March 14, 2024 WIB
Last Updated 2024-03-14T11:57:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही' !

Advertisement

सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश 
मुंबई :  शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरायचा नाही, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका, अशा शब्दांत कोर्टाने अजित पवार गटाला सुनावलं आहे. यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. 
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान अजित पवार गटाला फटकारलं. जेव्हा निवडणूक जवळ येतात तेव्हा तुम्हाला शरद पवारांची गरज वाटते. जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा मात्र तुम्हाला गरज वाटत नाही. आता तुमची एक वेगळी ओळख आहे. तुम्ही मतदारांमध्ये जाताना याच नव्या ओळखीने गेलं पाहिजे अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सुनावलं आहे. तसंच कोर्टाने अजित पवार गटाला 2 दिवसांत लेखी हमी देण्याचा आदेश दिला आहे. 19 मार्चला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. 

फोटो वापरत नसल्याचा अजित पवारांचा दावा
आपण शरद पवारांचं नाव, फोटो वापरत नसल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. आम्ही त्यांचे फोटो वापरले, पण त्यांनी सांगितले जर माझा फोटो वापरला तर कारवाई करावी लागेल. आम्ही सुसंस्कृत म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो वापरतो. व्यक्ती ह्यात असल्यावर त्याच्या संमतीने फोटो वापरावा लागतो. आम्ही त्यांचे फोटो वापरत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.