#

Advertisement

Thursday, March 14, 2024, March 14, 2024 WIB
Last Updated 2024-03-14T12:19:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले

Advertisement

मुंबई : बारामती लोकसभा निवडणूक माजी आमदार विजय शिवतारे यांनी अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सासवडमध्ये झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत एकमतानं याबाबत निर्णय घेण्यात आला. बारामती मतदारसंघ कुणाची जहागीर नाही असं सांगत त्यांनी अजित पवारांवर  टीका केली आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत पवारांनाच ललकारलं आहे. यातच आता शिंदे गटाच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना फोन करून त्यांना भेटण्यासाठी बोलावले आहे. शिवतारे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. वर्षा बंगल्यावर ही भेट होणार आहे. शिवतरे यांनी अजित पवार याना चॅलेंज करत बारामती मधून निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे.  उद्या या विषयावर मुख्यमंत्री आणि शिवतरे यांच्यात चर्चा होणार आहे.
अजित पवारांची पत्नी म्हणून सुनेत्रा पवारांना आम्ही मतदान का करायचं. असा जाहीर सवाल शिवतारेंनी विचारला आहे. तसंच या लढाई रावण कोण असेल हे सर्वांना माहित असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधलाय. विजय शिवतारेंना पवारांविरोधात बारामती लोकसभेत दंड थोपटले आहेत.. तेव्हा बारामतीमध्ये आता पवार कुटुंब विरुद्ध शिवतारे असाच सामना रंगणार आहे.