#

Advertisement

Wednesday, March 20, 2024, March 20, 2024 WIB
Last Updated 2024-03-20T11:45:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडेसमोरील आव्हान वाढणार

Advertisement


बीड : भारतीय जनता पार्टीने माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि माजी खासदार पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र पंकजा मुंडेसमोरील आव्हान दिवसोंदिवस अधिक आव्हानात्मक होत असल्याचं चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला या मतदारसंघात अधिक बळ मिळाल्याचं चित्र दिसत आहे.
शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंची पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गट बीडमधील लोकसभा निवडणुकीचं तिकीट देणार असल्याची चर्चा सुरु आहे. 
मागील निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंविरुद्ध लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या बजरंग सोनावणेंनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करण्याची तयार केली आहे. या माध्यमातून सोनावणेंनी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. बजरंग सोनावणेंनी अगदी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेत थेट शरद पवार गटात प्रवेश घेण्याची औपचारिकता शिकल्लक आहे.