#

Advertisement

Friday, March 22, 2024, March 22, 2024 WIB
Last Updated 2024-03-22T12:11:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रणिती शिंदे माफी मागा, मतदारसंघात फिरू देणार नाही !

Advertisement

 मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांचा इशारा
सोलापूर : ते मराठा आंदोलक नव्हते मराठा आंदोलकाच्या नावाने भाजपचे लोक मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन बदनाम करीत आहेत, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे. हा आरोप मराठा क्रांती मोर्चाने फेटाळला आहे. तसेच शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी रात्री शिंदे  यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. भाजप कार्यक्रत्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
प्रणिती शिंदे यांची ही राजकीय स्टंटबाजी आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. प्रणिती शिंदे या मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. त्यांना मराठा समाजाने अडवले. त्यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी प्रणिती शिंदे घेत आहेत. गुरुवारी पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात लोकप्रतिनिधींना गाव बंद आंदोलन सुरू आहे. गावबंदी असताना गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम सकल मराठा समाज करीत आहे.