#

Advertisement

Monday, March 25, 2024, March 25, 2024 WIB
Last Updated 2024-03-25T18:37:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"भाजप"ला ॲड. कोमलताई ढोबळे यांची नाराजी महागात पडणार

Advertisement

सातपुते यांना उमेदवारी दिल्यानंतर स्टेट्सची जोरदार चर्चा

सोलापूर : भाजपाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली. मतदारसंघातील भाजपा आमदारांनी सातपुते यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. मात्र माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या ऍड. कोमल ढोबळे- साळुंखे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वेगळेच संकेत दिले आहेत. कोमल ढोबळे यांचा सोशल मीडियाचा स्टेटस चर्चेचा विषय आहे. ढोबळे यांचे सोलापूर मतदार संघातील वर्चस्व आणि त्यांच्याकडील एकगठ्ठा मतदान संख्या पाहता कोमलताई ढोबळे यांची ही नाराजी भाजपला महागात पडणार असल्याची चर्चा आहे.

सोलापूर मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते यांच्यासह माजी खासदार अमर साबळे, कोमलताई ढोबळे, सनदी अधिकारी भारत वाघमारे, उद्योजक मिलिंद कांबळे यांची नावे चर्चेत होती. सोलापूर मतदारसंघात भाजपचे चार आमदार आहेत. भाजपने मागील दोन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका भाजपच्या ताब्यात होती. तरीही भाजपला सोलापूरचा उमेदवार जाहीर करायला वेळ लागला. इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. अखेर रविवारी रात्री भाजपने आमदार राम सातपुते यांची उमेदवारी केली. यावर कोमल ढोबळे यांनी सोशल मीडियावरून एक संदेश दिला आहे. कोमलताई ढोबळे म्हणतात, 'मनासारखा उमेदवार नसेल तर नोटा समोरचे बटन दाबा. पण मतदानाचा हक्क नक्की बजावा'. या स्टेटस सोबत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा फोटोही जोडला आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महिला उमेदवार देणार असे संकेत भाजप ने सुरुवातीला दिले होते. ऍड. कोमलताई ढोबळे या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या, तशी त्यांनी तयारी ही केली होती. सर्व मुद्दे लक्षात घेता मतांच्या जमा बेरजेवरून त्यांचा विजय ही नक्की मानला जात होता. मात्र, ऐनवेळी भाजप ने शिंदे यांच्या विरोधात पुरूष उमेदवार दिला.