#

Advertisement

Friday, March 29, 2024, March 29, 2024 WIB
Last Updated 2024-03-29T17:41:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरचा उमेदवार बदला : १९ जण इच्छुक असताना दिला उपरा उमेदवार

Advertisement

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे स्थानिक 19 इच्छुक उमेदवार असताना त्यांना का डावलण्यात आले? असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे. भाजपने बाहेरील उमेदवार बदलून स्थानिक उमेदवार नाही दिला तर भाजपचा पराभव होणार असल्याचा दावा दिलीप शिंदे यांनी केला आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेरील उमेदवार दिल्याचा आरोप केला जात आहे. राम सातपुते यांना उमेदवारी देण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने राम सातपुते यांचं नाव जाहीर केलं आहे. सोलापुरात शिंदे विरुद्ध सातपुते असा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यासही सुरुवात केली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लेटर वॉरही सुरू झालं आहे. मात्र, भाजपच्या एका इच्छुक उमेदवाराने थेट सोलापूरचा उमेदवारच बदलण्याची मागणी भाजप कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती सेलचे माजी उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केली आहे.
सोलापूरमधून लोकसभेसाठी दिलीप शिंदे हे इच्छूक आहेत. सोलापुरातील उमेदवार बदला अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. माढ्यातील भाजपचा उमेदवार बदला ही मागणी जोर धरत असताना आता सोलापूरचा ही उमेदवार बदलण्याची मागणी पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या ऐवजी सोलापूरच्या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच दिलीप शिंदे यांनी थेट मागणी केल्याने या मागणीला आणखी बळ मिळालं आहे.