Advertisement
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली सविस्तर चर्चा
मुंबई : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या शर्यतीत असलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व त्यांची कन्या अॅड कोमल ढोबळे-साळुंखे यांची उमेदवारी डावल्यानंतर नाराजीचे पडसाद उमटू नयेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बोलावून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून सलग १० वर्षे उमेदवार मोठ्या फरकाने विजय होऊन देखील या मतदारसंघात केंद्रातील व राज्यातील सत्तेचा उपयोग करून घेता आलेला नाही, त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न तसेच रखडले आहेत. मतदारसंघात नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सोलापूरातून किमान १९ जण इच्छुक होते.
तर, काँग्रेसकडून फक्त आमदार प्रणिती शिंदे हे एकमेव नाव अखेरपर्यंत चर्चेत राहिले. परंतु, भाजपकडून दररोज एक नाव बदलत गेले अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर स्थानिक इच्छुक दावेदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. त्या नाराजीवर अॅड कोमल ढोबळे- साळुंखे यांनी त्याच दिवशी आपले व्हाट्सअप स्टेटस खासदार शरद पवार यांच्या समवेतील जुने फोटो टाकत लावा तर्क, असा संदेश दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत जिल्ह्यातील अनेक नाराज घटकांना मुंबईतील सागर बंगल्यावर बोलून त्यांची नाराजी दूर करत कामाला लागण्याची सूचना दिल्या, यामध्ये भाजप प्रवत्ते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना देखील आज बोलावून त्याबाबत सूचना दिल्या. ढोबळे साहेब आपली नाराजी दूर करून न्याय देवू, असा शब्द त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी जिल्ह्यातील पक्षीय उमेदवार समोर असलेली आव्हाने व मतदारसंघातील प्रश्न याविषयी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहेत.