#

Advertisement

Wednesday, March 6, 2024, March 06, 2024 WIB
Last Updated 2024-03-06T11:00:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत

Advertisement

पुणे : बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतू आता हे समीकरण बदलणार का ? अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप बरोबर सत्तेत जाऊन पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे घेत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
बारामतीत काका पुतण्याची ताकद किती याच अंदाज घेणं सुरू झाल आहे. अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार? याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला. त्यामुळे पक्षाचे पदाधिकरी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला. अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठिमागे उभे राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने चंग बांधला असताना अजित पवारांचे बंड व पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहिण सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारे ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.