#

Advertisement

Monday, March 4, 2024, March 04, 2024 WIB
Last Updated 2024-03-04T13:34:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पाणी संकट मोठे, विद्यार्थ्यांनी जलजागर दूत व्हावे : कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

Advertisement

जलदिंडीस बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या शुभेच्छा 

सोलापूर :  आगामी काळात पाण्याचे खूप मोठे संकट निर्माण होणार आहे. लोकांना पाणी बचत करणे गरजेचे आहे. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी काळाची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांना जलजागर दूत व्हावे लागेल. पाणी आडवा, पाणी जिरवा मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. 

सावली फाउंडेशन आणि ड्रीम फाउंडेशन यासह विविध संस्थांच्या वतीने जागतिक जल वन व हवामान दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव ते वसुंधरा महाविद्यालयापर्यंत जलदिंडी काढण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते या जलपूजनाने दिंडीची सुरवात झाली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी आमदार नरसिंग मेंगजी, एम. के. फाउंडेशनचे नागेंद्र कोगणुरे, सावली फाउंडेशनचे दत्ता पाटील, संयोजक काशिनाथ भतगुणकी, डॉ. प्रकाश घतोळे, माझी सैनिक संघटनेचे अरुण तलीखेडे, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख, स्वामी विवेकानंद प्रशाला मुख्याध्यापक प्रा. अंबादास पांढरे उपस्थित होते.

जल जागृती दिंडीत संगमेश्वर महाविद्यालय, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, वसुंधरा महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच युवराज हॉस्पिटल, गणेश नाईक प्रशाला, स्वामी. विवेकानंद प्रशाला, रेवणसिद्धेश्वर कन्नड प्रशाला, ड्रीम आएएस सेंटरमधील विद्यार्थी देखील सहभागी झाले. ही दिंडी धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव, विजापूर नाका, आयटीआय, भारती विद्यापीठ मार्गे दावत चौकातून वसुंधरा महाविद्यालयात विसर्जित झाली. या दिंडीत बालाजी अमाईन्स, वन विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघांनी सहभाग घेतला. 

यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते डॉ. राहुल मेडीदार, डॉ. तेजस काळे, डॉ. संतोष राठोड, दत्ता शिंगे, डॉ. प्रकाश घटोळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जल दिंडीसाठी प्रा. घंटेवाड, प्रा. मोगली, प्रा. कोळी, संगीता भतगुणकी, डॉ. वासंती पांढरे यांनी सहकार्य केले. शाहीर रमेश खाडे यांनी स्वागत केले. प्रस्ताविक संयोजक काशिनाथ भतगुणकी यांनी केले. आभार प्रा. अंबादास पांढरे यांनी मानले. दरम्यान, या जलदिंडी कार्यक़्रमास बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी शुभेच्छा दिल्या.