#

Advertisement

Tuesday, March 5, 2024, March 05, 2024 WIB
Last Updated 2024-03-06T06:55:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गाव भेटीवर आलेल्या आमदार प्रणिती शिंदेसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी पिटाळले

Advertisement

  


पाटखळ येथील गावकऱ्यांनी गमराठा आरक्षण व पाणी पुरवठा  आश्वासनांचा विचारला जाब 

मंगळवेढा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आलेल्या लोकसभेच्या काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठकळ येथील युवकांनी मराठा आरक्षण प्रलंबित असताना व २४ गावच्या पाण्याचा प्रश्न पेटत असताना तुम्ही गावभेट दौरा घेऊ नका, असे सांगत त्यांच्या दौऱ्याला विरोध केला. 

सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यानुसार  प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील काही गावांचा गावभेट दौरा सुरू केला. मात्र, पहिल्यांच दौऱ्यात त्यांना मिठाचा खडा लागला. पाटकळ येथे गाव भेट दौऱ्यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आज, सकाळी नऊ वाजता शिंदे यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी दौऱ्याची पूर्व तयारी केली होती. प्रणिती शिंदे गावात आल्यानंतर गावातील युवकांनी मंगळवेढा तालुक्यातील २४ गाव शेतीच्या पाण्याचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटला नाही. या पाण्याचा प्रश्न प्रलंबित असून या भागातील नागरिक या पाण्यासाठी आंदोलन करीत असताना आपण या भागात गावभेट दौरा करू नये तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, सगळ्यांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत संताप व्यक्त केला. त्यावेळी गावातील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु,  याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडलेल्या खुर्च्छा व इतर साहित्य गोळा केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसरीकडे एका सभामंडपात कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले. परंतु, तिथेही जाऊन त्या संबंधित युवकांनी कार्यक्रम करू नका, असे सांगितले. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह

उपस्थित पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढील गावाची वाट धरली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह ऍड नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, मारुती बापू वाकडे, पांडुरंग जावळे, नाथा आयवले आदी उपस्थित होते.