Advertisement
दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाने 400 चा आकडा पार करण्याचा निर्धार केला आहे.. भाजपाने त्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत भाजपा नेतृत्वाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, केरळ आणि तेलंगणा यांच्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे.
भाजपाच्या यादीत काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाऊ शकते. ज्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जाऊ शकतो. पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि बॉलीवूडचे दिग्गज शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी लढण्यासाठी भाजपा भोजपुरी स्टार पवन सिंगला मैदानात उतरवू शकते. याशिवाय मध्य प्रदेशात भाजपा धक्का देऊ शकतं. प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी न देता शिवराज सिंग चौहान यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
