#

Advertisement

Friday, March 15, 2024, March 15, 2024 WIB
Last Updated 2024-03-15T11:53:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

‘भाजप’च्या यादीत यामुळेच ढोबळे यांचे नाव

Advertisement

महिला उमेदवार म्हणून अ‍ॅड. कोमलताई ढोबळे-साळुंखे सक्षम पर्याय 

सोलापूर : राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात निवडून येणारा उमेदवाराच द्यायचा, असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. पहिल्या आणि दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर हे स्पष्ट झालेच आहे. आता, तिसर्‍या यादीत सोलापूरचा उमेदवाराचे नाव जाहीर होणार आहे. यामध्ये भाजप प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे किंवा त्यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ढोबळे यांना उमेदवारी देताना भाजप पुढील मुद्यांचा विचार करू शकते.

सोलापूर मतदार संघाची 2019 मधील लोकसभेची निवडणूक लक्षात घेतली तर भाजपने डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सुशिलकुमार शिंदे हे सहज जिंकून येणार, असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, त्यावेळी सोलापुराच्या राजकारणातील एक कडी निसटली होती. दलितांचे लोकनेते, मातंग समाजाचे नेतृत्त्व आणि बहुजन समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख होती ते माजी मंत्री लक्ष्णमराव ढोबळे यांनी ‘कमळ’ हाती घेतले होते. लोकसभेची जागा निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. विशेष म्हणजे डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांना मिळालेली विजयी आघाडीची मत ही दलित समाजाची होती. ही मत आली कोठून तर यामागे ढोबळे नावाचे ‘दलित कार्ड’ होते. परंतु, याबाबत स्वत: ढोबळे यांनी कधीची गवगवा केला नाही. शांत, सयंमी आणि शब्दांवर प्रभुत्व असलेल्या ढोबळे यांनी भाजपचे नेते म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून सोलापूरात काम सुरू ठेवले, त्यांच्या या कामाची दखल दिल्लीतील भाजप नेतृत्वानेही घेतली. 

आता, आगामी 2024मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांच्या ऐवजी नवा उमेदवार दिला गेला तर लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशिवाय कोणतेही नाव नाही. सोलापूर लोकसभेचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी दलित समाजाचा उमेदवार निवडून येतो. यावेळी तर भाजपला लोकसभेची एक-एक जागा महत्त्वाची असल्याने सोलापूरात आगामी लोकसभेसाठी ढोबळे हे ‘कार्ड’ चालविले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातही काँग्रेसच्या महिला उमेदवारापुढे महिला उमेदवार देण्याचा निर्णय झालाच तर ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमलताई साळुंंखे-ढोबळे यांच्या सारखा सक्षम पर्यायही भाजप अवलंबू शकतो.