#

Advertisement

Friday, March 15, 2024, March 15, 2024 WIB
Last Updated 2024-03-15T12:02:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"वेटिंग"वर ठेवल्याने नवनीत राणा टेन्शनमध्ये.....

Advertisement

मुंबई : भाजपने लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या यादीत अनपेक्षित नावं पहायला मिळाली. अशातच आता भाजपने नवनीत राणा यांना वेटिंगवर ठेवले आहे. यामुळे राणा दाम्पत्य मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे आता राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. तिकीट मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान खासदर नवनीत राणा यांना भाजपने वेटिंगवर ठेवले आहे. यामुळे राणा दाम्पत्याचीही धाकधूक वाढली आहे. 

राणा आपला युवा स्वाभिमान पक्ष भाजमध्ये विलीन...
गुरुवारी राणा यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोघेही दोन तास सोबत होते अशी माहिती राणा यांनी दिली. या भेटीत राणा यांच्या उमेदवारीबाबत देखील चर्चा झाली. राणा आपला युवा स्वाभिमान पक्ष भाजमध्ये विलीन करतात की नवनीत राणा त्यांच्या पतीच्या पक्षातून बाहेर पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधी येतोय याची आमी वाट पाहत असल्याचे राणा यांनी सांगितले