#

Advertisement

Wednesday, March 20, 2024, March 20, 2024 WIB
Last Updated 2024-03-20T12:45:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

....तर सोलापुरातून ऍड. कोमलताई ढोबळे उमेदवार

Advertisement

महिला उमेदवाराचा निर्णय झाल्यास भाजपकडून  "ब" यादी

सोलापूर : भाजपने सोलापूरात सावध खेळी केल्याचं पहायला मिळत आहे. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते या युवा तरुण आमदाराला जागा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव समोर येत आहे. परंतु, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. महविकास आघाडीकडून सोलापुरातून काँग्रेसकडून प्राणितीं शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजप ही सोलापुरातून महिला उमेदवार नावाची घोषणा करू शकतो, त्यानुसार भाजपचे प्रवक्ते लक्ष्मणराव यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव जाहीर होऊ शकते. अ यादी आणि ब यादी भाजपकडून तयार आहे. यामध्ये कोणती यादी अंतिम ठरविली जाते यावर सोलापुरातील उमदेवार ठरणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी देखील महायुतीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. भाजपने दुसरी यादी जाहीर केली अन् राज्यातील 20 जागेवर उमेदवार निश्चित झाले. तर येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीकडून देखील पहिली यादी समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप सोलापूरची आपली अ किंवा ब यादी जाहीर करणार आहे.
दरम्यान, भाजपचे  मिलिंद कांबळे हे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुकणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल, असं स्वत: प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. अशातच सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध महिला उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यास ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या सोबत शिंदे यांचा  थेट मुकबला होणार हे जवळजवळ निश्चित आहे.