Advertisement
अमरावती : अमरावतीची जागा भाजपा लढेल. जो उमेदवार असेल तो भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढेल. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. पाच वर्ष त्या भाजपासह राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी ताकदीने भाजपा आणि पंतप्रधान मोदींची बाजू मांडली आहे. अखेर अंतिम निर्णय संसदीय समिती किंवा निवडणूक समिती घेते. त्यावर अधिक भाष्य करु शकत नाही," असं भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
अमरावती मतदारसंघ नवनीत राणा यांच्यासाठी सोडण्यात येणार आहे. केंद्रीय संसदीय समितीकडूनही यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. भाजपाच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे, तेथील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मी आणि चंद्रशेखर बावनकुळे दौरा करत आहोत. आज आम्ही अकोल्यात असून, उद्या वर्ध्याला जाणार आहोत. आम्ही सगळ्या मतदारसंघात जाणार आहोत. जाहीर प्रचाराच्या आधी सर्व प्लॅनिंग करत आहोत. तसंच काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न आहे, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
