#

Advertisement

Friday, March 15, 2024, March 15, 2024 WIB
Last Updated 2024-03-15T12:22:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे यांच्या विरोधात "यशवंत सेना"

Advertisement

बीड : भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने तिकीट तर दिले पण निडणुक जिंकायची कशी? अशी स्थिती पंकजा मुंडे यांच्यासमोर निर्माण होऊ शकते. कारण, लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात "यशवंत सेना" मैदानात उतरणार आहे. "यशवंत सेने"चे नेते बाळासाहेब दोडतले यांनी निवडणूक लढवावी, असा देखील निर्णय झालेला आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभेच्या मैदानात यशवंत सेना उतरणार आहे.  वेगवेगळ्या पक्षाकडून धनगर समाजाला केवळ आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. प्रत्यक्षात कुठलाही लाभ दिला जात नाही. आरक्षण प्रश्नानंतर धनगर समाजाच्या विकासाचा प्रश्न देखील प्रलंबित असून याच प्रश्नावर बीड लोकसभेच्या मैदानात "यशवंत सेने"चा उमेदवार उतरवण्याचा निर्धार बीड मधील बैठकीत करण्यात आला आहे.
पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाच्या गावाला निधी दिला नाही. खासदार फंड तर आम्हाला माहीतच नाही त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्या विरोधात उतरत असल्याचे धनगर समाज बांधवांनी म्हटले आहे.