#

Advertisement

Friday, March 15, 2024, March 15, 2024 WIB
Last Updated 2024-03-15T12:11:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनबाईपुढे निवडणुकीतून सासऱ्यांची माघार

Advertisement

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. सुनबाईपुढे सासरे माघार घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. रावेरमधून  लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 
रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून रावेरमधून एकनाथ खडेस यांचे नाव चर्चेत होते. मात्र, प्रकृतीचे कारण देत एकनाथ खडसे यांनी  रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास एकनाथ खडसे यांनी नकार दिल्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या मतदार संघात कोणला उमेदवारी देणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.