#

Advertisement

Monday, April 1, 2024, April 01, 2024 WIB
Last Updated 2024-04-01T11:23:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुप्रिया सुळेंचं WhatsApp Status चर्चेत

Advertisement

शरद पवारांच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शननं वेधलं लक्ष

बारामती :मतदारसंघामध्ये नणंद-भावजय असा थेट संघर्ष पवार कुटुंबातील सदस्यांमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर याच मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमध्ये दोन्ही बाजूने जोरादर प्रचाराला सुरुवात झाली आहे. शरद पवार राष्ट्रीय स्तरावरील 'इंडिया' आघाडीसंदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते वेगवेगळ्या मतदारसंघांचे दौरे करुन उमेदवार कोण असावा यासंदर्भातील चाचपण्या करत आहेत. असं असतानाच आता सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला शरद पवार यांच्या समर्थकांकडून व्हायरल केला जाणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवारांचे 2 फोटो दिसत आहेत. यापैकी डवीकडील फोटो हा पक्षामध्ये फूट पडून अजित पवार आणि समर्थक आमदार दूर गेल्यानंतर झालेल्या शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमधील आहे. तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्वत: हात वर करत 'मी' असं हसत उत्तर दिलेलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
दुसरा फोटो सुद्धा शुक्रवारी साताऱ्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील आहे. उदयनराजे भोसले तिकीट मागायला आल्यास तुमच्या पक्षाकडून तिकीट देणार का? या प्रश्नावर शरद पवारांनी अशी काही शक्यता नाही असं उत्तर दिलेलं. त्यानंतर अन्य एका पत्रकारने तुम्ही उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्येच दोन्ही हातांनी आपली कॉलर उडवून दाखवली होती. हे पाहून पत्रकारांबरोबरच त्यांच्या बाजूला बसलेले खासदार श्रीनिवास पाटील आणि इतर सहकारीही खदखदून हसले होते.