#

Advertisement

Friday, April 5, 2024, April 05, 2024 WIB
Last Updated 2024-04-05T12:00:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नवनीत राणांच्या संपत्तीत पाच वर्षात 253 टक्के वाढ

Advertisement

अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना नवनीत राणांनी दिलेल्या शपथपत्रातून त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीविषयी माहिती समोर आली आहे.
अमरावीत लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नवनीत राणा यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली आहे. नवनीत राणा यांनी गुरुवारी भाजपच्या तिकीटावर आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टानेही जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरत या प्रकरणात नवनीत राणांना मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांसोबत सभा झाल्यानंतर नवनीत राणा यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी खासदार नवनीत राणा सादर केलेलं संपत्तीचे शपथपत्र समोर आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात म्हणून खासदारकीच्या काळात वार्षिक 253 टक्के वाढ झाली आहे. नवनीत राणा यांचे  2022 -23 मधील उत्पन्न हे 15 लाख 456 रुपये इतके होते. तर आता नवनीत राणा यांच्याकडे रोख रुपयांमध्ये 3 लाख 78 हजार 140 रुपये आहेत. खासदार नवनीत राणा यांच्याकडे 5 कोटी 32 लाखाची जंगम मालमत्ता आहे. नवनीत राणा यांच्याकडे तब्बल 5 कोटी 25 लाख 17 हजार 235 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वाहनांमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याकडे 65 लाख रुपयांच्या दोन फॉर्च्युनर गाड्या आहेत.