#

Advertisement

Monday, April 8, 2024, April 08, 2024 WIB
Last Updated 2024-04-08T11:01:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

साताऱ्यातून उदयनराजे भोसले विरोधात शशिकांत शिंदे

Advertisement

सातारा : भाजपने अधिकृत घोषणा केली नसली तरी साताऱ्यातून उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाले आहे. साताऱ्यात महाविकास आघाडीतर्फे कोण उदयनराजेंना टक्कर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतर्फे  काँग्रेस नेते  पृथ्वीराज चव्हाण हे  उदयनराजे भोसले यांच्याविरोधता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता  पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा बडा नेता  उदयनराजे भोसले यांच्याविरोधता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला आहे. महाविकासआघाडीतर्फे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

शशिकांत शिंदे 15 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या उमेदवारा विरोधात तगडा उमेदवार देण्यावरुन हालचाली झाल्या होत्या.  उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीचा थेट सामना होण्याची चिन्ह आहेत.