#

Advertisement

Thursday, April 4, 2024, April 04, 2024 WIB
Last Updated 2024-04-04T11:59:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सभेच्या मंचावर नवनीत राणांना अश्रू अनावर

Advertisement

अमरावती : लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. नवनीत राणांच्या नामांकन रॅलीच्या आधी दसरा मैदानात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार रवी राणा यांनी भाषणात आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आमचा एक मित्र देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उपयोग करून घेतात, असे रवी राणा म्हटले. तर रवी राणांचं भाषण सुरू असताना भाषण ऐकूण नवनीत राणा यांना अश्रू अनावर झालेत. रवी राणांनी यावेळी बच्चू कडूंवर जोरदार प्रहार केलाच. बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे अमरावतीत महायुती, महाविकास आघाडी आणि प्रहार अशी तिरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे.