Advertisement
बहुजन रयत परिषद बैठकीत प्रदशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची टीका
पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी पक्ष सत्तेचा दरुपयोग करून लोकशाही सुंपववण्याचे कटकारस्थान करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे, तर, विरोधक अपप्रचार करून विकासाला खीळ बसवत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, सत्तेच्या या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी लढणारे जनतेच्या प्रश्नांसाठी कधी लढणार, असा रोखठोक सवाल बहुजन रयत पररषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केला आहे.
पुणे येथे झालेल्या बहुजन रयत पररषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. ॲड. कोमलताई म्हणाल्या की, राजकारणाची दुर्दशा होत असताना जनतेच्या आयुष्याची दुर्दशा होत आहे. देशाला स्वातुंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली अनेक पक्ष सत्तेवर आले. पण, महागाई आणि बेरोजगारी हे दोन प्रश्न कुठल्याही सरकारला सोडविता आलेले नाहीत. पक्षीय राजकारणात नेते फक्त खुर्ची मिळवण्यासाठी मतदारांचा वापर करीत आहेत. जनह,त देशहित हे शब्द फक्त मतदारांना भुलवण्यासाठी वापरले जात आहेत. लोकशाही टिकली पाहिज असे म्हणणारेच लोकशाहीचा गळा आवळत आहेत. सध्या, देशात आणि राज्यात ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, त्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. भारतीय राजकारणात अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या कााँग्रेसच्या रटाळ आणि सुस्त कारभाराला कुंटाळून अखेर मतदारांनी त्यांना घरी बसवले. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला कटाळून मतदारांनी त्यांना नाकारले. आणि सबका साथ, सबका विकास म्हणणाऱ्या भाजपला साथ दिली. देशातली भोळीभाबडी जनता गेली दहा वर्षे वाट बघतेय, की अच्छे दिन कधी येणार? महागाई कमी करणार, नोकऱ्या देणार, भ्रष्टाचार, गुन्हेगारी संपवणार, सशक्त भारत घडवणार... पण कधी? असे सवाल ॲड. कोमलताई उपस्थित करताना त्या पुढे म्हणाल्या की, दिलेला शब्द पाळणारे, शब्दाला जागणारे आणि डोळे झाकून विश्वास ठेवावा असे लोकनेते आता राहिलेले नाहीत. गेला तो जमाना, ती माणस पण गेली, त्यांनी देश घडविण्यासाठी प्राण पणाला लावले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री हे फक्त कााँग्रेसचे नेते नव्हते तर सामान्य जनतेचे नेते होते. म्हणूनच लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. भारतीय जनसुंघाचे नेते शामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दीनदयाळ शर्मा यांनी राष्ट्रहितासाठी प्राणांची आहुती दिली. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी सामान्य जनतेचा प्रवक्ता म्हणून राजकारणाला सुरूवात केली आणण अखेरपर्यंत त्यांनी लोकहिताचे राजकारण केले. जनतेची बाजू मांडणारा, जनतेसाठी भांडणारा असा प्रवक्ता आज कोणत्याही पक्षात नाही. जातीपातीच्या राजकारणामुळे देश दुभंगत चालला आहे. फोडाफोडीच्या कुटनितीमुळे लोकशाहीला तडे जाऊ लागले आहेत. विश्वास ठेवायचा तरी कोणावर, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे, मतदारांनी आत विचार करून निर्णय घेणे गरजेचे ठरत असल्याचे ॲड. कोमलताई यांनी स्पष्ट केले.
