#

Advertisement

Thursday, April 11, 2024, April 11, 2024 WIB
Last Updated 2024-04-11T12:46:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढाचं समीकरण बदललं, शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर

Advertisement

माढा : लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील यांनी आता भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. माढ्यातील हेवीवेट कुटूंब असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशिल मोहिते पाटील आग्रही होते. पण रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशिल मोहित पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची वाट धरली आहे.
माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. येत्या 14 तारखेला धैर्यशील मोहिते-पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्यात मोहिते-पाटिल आणि शिरूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट झाली होती. या दोन नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मोहिते पाटील कुटुंबाने एकमतानं लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं असल्याचं जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केलं होतं.. धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील.