#

Advertisement

Saturday, April 13, 2024, April 13, 2024 WIB
Last Updated 2024-04-13T10:53:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Advertisement

शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने भावना अनावर
बारामती : लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेने शरद पवार यांच्या कन्येला तीनदा निवडणूक जिंकून संसदेत पाठवले, आता त्यांनी शरद पवारांच्या सुनेला विजयी करावे, असे म्हटलं. यासोबत पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहनही अजित पवारांनी बारामतीत केल आहे. 
त्यावर शरद पवारांनीही आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र, आता शरद पवारांनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख सुनेत्रा पवारांकडे होता, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबत सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं टाळल. मात्र, या वक्तव्यामुळे त्यांना भावना अनावर झाल्या.  माध्यमांनी शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ या वक्तव्याबद्दल विचारले असता सुनेत्रा पवार भावूक झाल्या. याबाबत आपलं काय म्हणणं आहे असं विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ मान हलवत डोळ्याला रुमाल लावून आपले अश्रू पुसले.