#

Advertisement

Wednesday, April 10, 2024, April 10, 2024 WIB
Last Updated 2024-04-10T11:45:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माझ्या नादी लागू नका ! प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

Advertisement

अकोला : वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेत विजय वडेट्टीवार यांना मोठा इशारा दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे की,  निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
दरम्यान, सांगलीचे राजकारण तापलेले असताना सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील, अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली.