Advertisement
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा ट्विस्ट
सोलापूर : लोकसभा मतदार संघात प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षात सरळ लढत होत असताना बहुजन वंचित आघाडीनेही रिंगणात उडी घेतली आहे, अशावेळी मतांची जुळवाजुळव करताना या पक्षाच्या उमेदवारांना मोठी आकडेमोड करावी लागत आहे. अटीतटीची लढाई होत असल्याने कोणत्याही संस्था अन् समाज घटकासह एका-एका सामान्य नागरिकाचे मत महत्त्वाचे ठरणार आहे, अशा स्थितीत सोलापुरात मातंग समाजाचे नेते तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांचा विसर पक्षासह भाजपच्या उमेदवारांलाही पडलेला दिसतो. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कन्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विशेष बैठकीकडे कोणलाच दुर्लक्ष करून चालणार नाही, आपल्याला कोणत्याही पक्षाला थेट पाठींबा द्यायचा नाही, जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच मतदान करायचे, हे ऍड. कोमलताई यांनी केलेले आवाहन राजकारणाला मोठी कलाटणी देणार ठरू शकते.
सोलापुरातील ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे राज्य प्रवक्ते आहेत. लोकसभेसाठी ते इच्छुक होते तर महिला उमेदवार द्यायचा झाल्यास त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. परंतु, राम सातपुतेंना उमेदवारी दिली गेली, त्यानंतर ढोबळे यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमुंत्री दवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले होते, परंतु आगामी काळासाठी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यानंतर ढोबळे शांत झाले असले तरी बापासाठी लेक ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या सातत्याने पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान त्यांनी शरद पवार यांचे जुने फोटोंचे स्टोटस ठेवत खळबळ उडवून दिली होती. त्या शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता प्रचार रंगात येत असताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकारी, कार्यक़र्त्यांची विशेष बैठक घेत आढावा घेतला. बहुजन रयत परिषद थेट कोणत्याही पक्षाला पाठींबा देणार नसल्याचे जाहीर करीत असताना जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले, शिवाय आपण आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलाच तर बहुजन रयत परिषदेची स्वतंत्र भूमिका कायत राहील, असे सुतोवाच करीत त्यांनी पुन्हा एकदा राजकीय तज्ज्ञांना लावा तर्कचे... आव्हानच दिले आहे. एकुणच काय तर भाजपचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या बहुजन रयत परिषदेची ताकद त्यांच्या समाजाकडून होणारे लाखोंचे मतदान आणि विशेष म्हणजे त्यांच्या कन्या अड. कोमलताइ साळुंखे-ढोबळे यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
