#

Advertisement

Friday, April 26, 2024, April 26, 2024 WIB
Last Updated 2024-04-26T11:53:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...'

Advertisement

सदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय 

माढा : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरु असून  नेत्यांकडून पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांचा म्हातारा असा उल्लेख केला आहे. म्हातारा लय खडूस आहे अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना देत नाहीत असंही यावेळी ते म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. 
ही लढाई खऱ्या अर्थाने वाडा विरुद्ध गावगाडा, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आहे.  या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक चर्चा आहेत. काय तर म्हणे साहेबांचं वय 84 म्हणून ते 84 सभा घेणार अशा चर्चा सुरू आहेत. आता साहेबाला काय काम आहे? त्यांना म्हसरं राखायची आहेत? की जनावारांना पाणी पाजायचं आहे? तोच धंदाच करायचा आहे. पण त्यांना मानलं पाहिजे. या वयातही ते आमच्या सारख्यांना संधी देत नाहीत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 
मुलगा कर्तबगार झाला की त्याच्या हातात प्रपंच  देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडत आहे. अजित पवार किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवरांच्या लक्षात आलं की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतंय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही.  कारण आता हे बास झालं आता आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच  म्हातारा झाल्यावर करायचा का?  म्हणून अजितपवार मोठ्या ताकजीने विकासासाठी महायुतीमध्ये आले, असं सदाभाऊ खोत म्हणाले.