#

Advertisement

Friday, April 19, 2024, April 19, 2024 WIB
Last Updated 2024-04-19T11:39:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अ‍ॅड. कोमलताईंनी त्या चिमुकलीची घातली वेणी...

Advertisement

सोलापूर : बुद्धभूमी सामाजिक विकास संस्थेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमावेळी व्यासपीठावर महानग्या मुलामुलींचा वावर लक्षवेधी ठरत होता. यावेळी  एका मुलीचे केस विस्कटल्याचे निदर्शनास येताच अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी त्या मुलीला जवळ घेत तीचे केस स्वत:च्या हाताने विंचरत तीची छानशी वेणी घातली. अखंड कार्यक्रमास उपस्थितांनी ताईंच्या या आपुलकीचे मोठे कौतूक केले.
दरम्यान,  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षानंतरही बहुतांशी समाज शिक्षणापासून वंचीत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची आज सर्वांनाच गरज आहे, ते आमलात आणावेत, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन मोठे व्हावे, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
बुद्धभूमी सामाजिक विकास संस्थेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी आजची देशाची सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीविषयी भाष्य केले. आजच्या राजकीय लोकांना केवळ राजकाणात स्वारस्य आहे. शिक्षणाविषयीच्या  मूलभूत सुविधेकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. खरे तर आज डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची समाजाला खर्‍याअर्थी गरज आहे, त्यांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित राहू नयेत, समाजातील मुला-मुलींनी शिक्षीत व्हावे, बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श कायम ठेवावा, त्यांचे विचार हे जीवनात उपयोगी पडतात यातून आपल्याला योग्य दिशा मिळते, असेही अ‍ॅड. कोमलताई यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या हस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना स्कूल बँग आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बुद्धभूमी सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातील मान्यवर उपस्थित होते.