Advertisement
सोलापूर : आम्ही पक्षासोबतच आहोत. मात्र, निधी देताना लक्ष दिले जात नाही. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून आमच्या गटाला डावलले जात आहे. आताही आम्ही काम केल्यास श्रेय दुसऱ्याला मिळणार, आता कुठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे, त्यामुळे बूथ यंत्रणा कशी सक्षम होणार, आम्हाल विश्वासात न घेताच आमची पद काढून घेतली, उमेदवारी अर्ज भरण्याबाबतचा साध निरोप देखली आला नाही, कसे काम करायचे, अशा शब्दांत सोलापुरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे खंत मांडली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक समर्थकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, गौरीशंकर बुरुकुल, युन्नुस शेख, काशीनाथ पाटील, भारत पाटील, औदुंबर वाडदेकर आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्यासमोर पक्षीय राजकारणा संदर्भातील तक्रारी मांडल्या. मी १९९५ पासून संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे, मात्र आम्हाला विश्वासात न घेता आमच्याकडील पद काढून घेतले. सहा महिने पक्षाला पदाधिकारी नव्हते. त्यामुळे बूथ यंत्रणा कशी सक्षम होणार, असा सवाल गोपाळ भगरे यांनी केला. उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात निरोप देखील दिला नाही, आम्ही पुढचे नियोजन कसे करायचे, अशी तक्रारही अनेकांनी मांडली. यावेळी फडणवीस यांनी भविष्यात योग्यवेळी प्रशांत परिचारक यांचा योग्य सन्मान करू, अशी ग्वाही दिली.
