#

Advertisement

Thursday, April 18, 2024, April 18, 2024 WIB
Last Updated 2024-04-18T12:36:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार

Advertisement

पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास 
बीड #मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा वनवास सुरू होता. त्यानंतर आता पंकजांनी विजयाचा निश्चय केल्याचं पहायला मिळत आहे. माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असं म्हणत पंकजांनी प्रचाराला जोर लावला आहे. 
 बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीराम नवमी कार्यक्रमानिमित्त बोलताना त्या म्हणाल्या की,  मला पण वनवास भोगायची तयारी ठेवावी लागली. मात्र, माझा वनवास संपलाय.. आता लवकरच राज्यभिषेक होणार आहे. माझ्या पराभवानंतर लोकांनी मला सन्मान दिला. माझ्या संघर्षातही लोकांनी मला सन्मान दिला आता ही लोक लोकसभा निवडणुकीत ही मला विजयी करतील, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.