#

Advertisement

Friday, April 19, 2024, April 19, 2024 WIB
Last Updated 2024-04-19T12:10:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभा मैदानातून छगन भुजबळ यांची माघार

Advertisement

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांचां मोठा निर्णय जाहीर केला आहे.  नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अद्याप उमेदवारीबाबात कोणताही निर्णय जाहीर झालेला नसल्याने  छगन भुजबळ यांनी लोकसभ निवडणुक न लढवण्याची निर्णय जाहीर केला आहे.
नाशिकबाबत होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून देवगिरीवर गेलो. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्याचे मला सांगितले. तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांचे नाव सांगितले. पण अमित शहा बोलले की तिथे छगन भुजबळ लढतील. मला उभे राहावं असं सांगितले गेले. यांनर मी नाशिकमध्ये आढावा घ्यायला सुरवात केली. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला.
देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलूनही मी माझ्या नावाची खातरजमा केली. पक्षाने जागा जाहीर करायला हवी होती. पण नंतर चर्चा सुरू झाल्या. नाशिकचा तिढा सुटलेला नाही. वेळ झाल्यास नुकसान होवू शकते. ताबोडतोब नाव जाहीर करायला हवे. समोरचा उमेदवार कामाला लागला आहे. मात्र, मी नाशिकच्या उमेदवारीवरून माघार घेतली आहे अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली.