Advertisement
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन सिल
पंढरपूर : पंढरपूरमध्ये शरद पवार निवडणूक दौऱ्यावर आहेत. त्याची प्रचार सभा सुरु होती. करमाळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा सुरू होती. या सभेत शरद पवारांचे भाषण सुरू होते. त्याचवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई सुरु झाली. या कारखान्यावर द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास 435 कोटी रुपयांची थकबाकी आहे. याची माहिती मिळताच कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना शरद पवार यांची सभा सोडून कारखान्याकडे जावे लागले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, कारखान्याच्या ३ गोडाऊनला द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सिल केले आहे. गोडाऊनमध्ये जवळपास एक लाख पोती साखर आहेत. द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कारखान्यावर जवळपास 435 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. एका राजकीय सभेत रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कारखान्यावर कारवाईची भीती व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सिल झाले. कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस लावण्यात आली आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे गोडाऊन सील झाले. त्यावरुन अभिजित पाटील यांनी नाराज व्यक्त केली. वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू, पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही. पवार साहेबांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
