Advertisement
‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
सातारा : केंद्रीय माजी मंत्री शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालेला. मूळ पवार आणि बाहेरचे पवार यांच्यात फरक, असं वक्तव्य त्यांनी केलं होत. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर आज शरद पवार यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण तसं वक्तव्य केलंच नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.
मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो, पत्रकाराने विचारलं, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिल.
