Advertisement
शरद पवार गटाची ऑफर?
मुंबई : महाविकास आघाडीचा साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटता सुटेना असं चित्र पपहायला मिळत आहे. सातारा लोकसभा निवडणुकीबाबत काही केल्या तोडगा निघत नाही. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर, काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटलांनी दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांच्या त्यांच्या घरी जात भेट घेतली होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मविआचे उमेदवार असतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचं खंडण पृथ्वीराज चव्हाणांनी स्वत: केले आहे.
