#

Advertisement

Monday, April 8, 2024, April 08, 2024 WIB
Last Updated 2024-04-08T11:42:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नाशिकमधून भुजबळांचा पत्ता कट?

Advertisement

स्वयंसेवक संघ मैदानात उतरला
नाशिक : नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळांना विरोध होत असल्याने दुसऱ्या उमदेवाराची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळांना होणारा वाढता विरोध बघता उमेदवार बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटा कडून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा आहे. तर भाजप आणि संघाकडून राहुल ढिकले यांचं नाव आघाडीवर आहे.
हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेसाठी आग्रह आहेत तर भाजपचे दिनकर पाटील हे देखील नाशिकच्या जागेची मागणी करत आहेत. ही जागा भाजपला सोडली जावी असा त्यांचा आग्रह आहे. या दोघांची नावं चर्चेत असतानाच अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची नाशिकसाठी चर्चा सुरू झाली होती. पक्षाकडून आदेश मिळाल्यास कामाला लागू असे सांगत भुजबळ यांनीही सूचक वक्तव्य केले होते. मात्र आता अचानक भाजपकडून राहुल टिकले यांचं नाव आघाडीवर आहे. 
भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग सांगतो !
नाशिक मतदारसंघासाठी अद्याप कोणताही नाव निश्चित झालेलं नसून नाशिकचा गोंधळ अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. एकीकडे छगन भुजबळ यांचं नाव दोन आठवड्यांपूर्वी अचानक समोर आलं. मात्र त्यांचं नाव समोर येताच भाजप, शिंदे गट तसंच इतर मित्रपक्षांकजून विरोध व्हायला सुरूवात झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भुजबळांचं नाव समोर येताच मराठा समाजाचा मोठा आक्रोश पहायला मिळाला. भुजबळांविरोधात मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले, गावागावांत त्याच्या विरोधाचे फलक लागले.
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला आहे.