#

Advertisement

Monday, April 8, 2024, April 08, 2024 WIB
Last Updated 2024-04-08T11:33:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकनाथ खडसे प्रवेशाबाबत आम्हाला नाही माहित...!

Advertisement

जळगाव: राज्य भाजपमध्ये पहिल्या फळीचे नेते असलेले एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर अनेक आरोप केले होते. अजून या दोन्ही नेत्यांवर आरोप करण्याची संधी एकनाथ खडसे सोडत नाही. आता एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राज्यातील नेत्यांना अजून कल्पना नाही. त्यांचे कट्टर विरोधक असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तर त्याला विरोध नाही. मात्र पक्षाने खडसे यांच्या बाबत अजून आम्हाला कळविले नाही. पक्षाने कळवले आम्ही त्यांचे स्वागतच करु.  जळगाव जिल्ह्यातील राजकीय विरोधक गिरीश महाजन म्हणाले, खडसेंचा प्रवेश कधी होणार आहे, हे त्यांनाच माहीत आहे. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी आहे. अमित शाह यांच्याशी आहे, असे ते म्हणतात. एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की, आमची भूमिका तिच राहणार आहे. ते दिल्लीला, जात आहेत, येत आहेत. आता त्यांनी सांगितलंय 15 दिवसांनी प्रवेश घेणार आहे. वाट बघू, एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचे ते काम नाही.