#

Advertisement

Wednesday, April 24, 2024, April 24, 2024 WIB
Last Updated 2024-04-24T12:28:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कोकणात शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचार

Advertisement

रत्नागिरी : भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबले आहेत. प्रचार पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचा फोटो नसल्याने आता प्रचार करणे शिवसैनिकांनी थांबवले आहे.
महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. आधीच उमेदवार घोषित होण्यास वेळ झाला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते. आता कुठे या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचाच फोटो नसल्याने शिवसैनिकांनी आता प्रचार थांबवला आहे.