Advertisement
धाराशिवचा गड कोण राखणार
धाराशिवमधील डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातला राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास : महाराष्ट्राला माहित आहे. पवनराजेंच्या हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटलांना अटकही झाली होती. आता तोच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीतही उतरला आहे. पवनराजेंचे चिरंजीव खासदार ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंहांचे चिरंजीव भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यातून विस्तवही जात नाही. शिवसेना ठाकरे गटानं आता पुन्हा एकदा ओमराजेंना उमेदवारी दिली आहे. तर राणांची पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवलं आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी महायुतीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभी आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून त्यांना राजकीय रसद मिळणार आहे. त्यामुळं ही लढत आणखी रंगतदार झाली आहे. निंबाळकर आणि पाटलांमध्ये परंपरागत वैर तर आहेच. आता त्याला राजकीय विरोधाची धार आली आहे. ओमराजेंना हरवणं वाटतं तितकं सोप्पं नाही. नव-याच्या पराभवाचा वचपा अर्चना पाटील काढणार का? यासाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार .आहे.
