#

Advertisement

Tuesday, May 21, 2024, May 21, 2024 WIB
Last Updated 2024-05-21T13:26:16Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढा लोकसभा : शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज

Advertisement

माढा : लोकसभा मतदार संघात निवडणूक कोण जिंकणार यावरुन एका शेकऱ्याने  11 बुलेटची पैज लावली आहे. निलेश पाटील या शेतक-याने ही अकरा बुलेटची पैज लावली आहे. ज्याला पैज लावायची आहे त्याचा उमेदवार निवडून आला तर निलेश पाटील त्याला बुलेट देणार आहेत. तुतारीवरचा उमेदवार निवडून आला तर पैज लावणा-याने पाटील यांना बुलेट द्यायची अशी ही पैज आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. शरद पवार यांच्या बद्दलची सहानभूती वाढली होती. शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीची जाणीव ठेवून माढा तालुक्यातील बावी येथील निलेश पाटील या शेतकऱ्याने पैज लावली आहे. निलेश पाटील हे सहा एकर द्राक्ष बाग असलेले शेतकरी आहेत. शरद पवार यांनी वेळोवेळी फळबागांसाठी केलेल्या मदतीची जाणीव त्यांना आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे पाटील यांनी आता तुतारी चिन्हावर उभे राहिलेले मोहिते पाटील निवडून येणार असा दावा केला आहे. त्याचा उमेदवार निवडून आला तर त्याला बुलेट द्यायची आणि तुतारीवरचा उमेदवार निवडून आला तर त्यानं पाटील यांना बुलेट द्यायची असे या पैजेच्या विड्याचं स्वरूप आहे. या पैजेच्या विड्याला जाहीर करून अद्याप तीन दिवस झाले तरी कोणीही हा विडा उचललेला नाही. तीन जून पर्यंत कोणीही यावे आणि अकरा बुलेटची शर्यत लावावी असा आव्हान निलेश पाटील यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.