#

Advertisement

Wednesday, May 22, 2024, May 22, 2024 WIB
Last Updated 2024-05-22T11:24:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Advertisement

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यात ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांचा समावेश आहे. या तिघांनाही आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. नीतेश शेवानी याने अल्पवयीन मुलाला पब मध्ये प्रवेश दिला आणि जयेश बोनकर याने मद्य सर्व्ह केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

सरकारी वकिलांचा युक्तीवाद
कोर्टात सरकारी वकील यांनी बाजू मांडताना मुलाला पबमध्ये जाण्यास संमती देण्यात आली आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी दिली याबद्दल अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला अटक केल्याचं सांगितलं. मुलाला जी गाडी दिली ती विना नंबर प्लेटची होती, मुलाला किती पैसे आणि डेबिट कार्ड दिलं होतं, याची माहिती घ्यायची आहे तसंच ब्लॅक पबचे कर्मचारी नितेश शेवानी आणि जयेश बोनकर यांनी कोणाच्या मेंबरशिप ने अल्पवयीन तरुणाला पबमध्ये प्रवेश दिला याचीही माहिती घ्यायची असल्याचं सांगितले.