#

Advertisement

Saturday, May 4, 2024, May 04, 2024 WIB
Last Updated 2024-05-04T10:40:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !

Advertisement

धाराशिव : शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले असून अजित पवार गट 2023 मध्ये मे महिन्यात शिंदे-भाजपा सरकारमध्ये सहभागी झाला. हे तिन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढवत असून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता शिंदेंच्या गटातील एका आमदाराने विधानसभा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदेंचं राज्याचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असतील,' असं शिंदे सरकारमधील राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचा उल्लेख करत तानाजी सावंतांनी हे विधान केलं. ते धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते. जाहीर भाषणामध्ये त्यांनी 2029 पर्यंत शिंदेंचं मुख्यमंत्री राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.