Advertisement
मुंबई : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर काढल्याचा दावा महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते जितेन गजारिया यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी X वर ट्विट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका खोलीत दिसत आहेत. त्यात उद्धव ठाकरे शरद पवार यांना नमस्कार करताना दिसत आहे. त्यानंतर शरद पवार त्यांना काहीतरी बोलल्यावर ते प्रतिक्रिया देऊन बाहेर जात आहे. यासंदर्भात जितेन गजारिया यांनी दावा केला आहे की, शरद पवार यांनी विनम्रतापूर्वक उद्धव ठाकरे यांना बाहेर जाण्याचे म्हटले आहे. कारण ते व्यस्त आहेत. हा व्हिडिओ ट्विट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा व्यवहार करत आहे. https://twitter.com/jitengajaria/status
