#

Advertisement

Wednesday, May 22, 2024, May 22, 2024 WIB
Last Updated 2024-05-22T11:33:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवाजीनगर कोर्ट परिसरात अग्रवालवर शाईफेकचा प्रयत्न

Advertisement

पुणे : कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. आता प्रकरणामुळं महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेकडून अल्पवयीन मुलाचा बाप विशाल अग्रवालवर शाईफेक करण्यात आली. 
पुण्यातील  हिट अँड रन प्रकरणानंतर आता वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात ही घटना घडली. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.